कर्तव्य बजवण्यासाठी psi दुचाकीवरून जाताना पतंगाच्या मांज्याने चिरला गळा.आतातरी घातक मांजावर पोलीस घालणार का आळा.
छ संभाजीनगर :- सविस्तर माहिती अशी की, छ संभाजीनगर ग्रामीन पोलीस ठाण्या मध्ये कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक दिपक पारधे हे रहाण्यास, सातारा येथील सुधाकरनगर वरुन सकाळी ड्युटीवर अपल्या दुचाकीवरून जाताना, पतंगाचा मांजा पारधेंच्या नरड्याला अडकून गळा चिरला गेला ,परिस्थिती इतकी नाजूक होती की गळ्यातून रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात होत होता.सतर्क नागरीकांना , त्यांना जवळच्या खाजगी दवाखान्यात दाखल केले.आय सी यू मध्ये असल्याचे पोलीस निरीक्षक संग्राम ताटे यांनी सांगितले.
पतंग शोकिन तरुणाचा शोध घेऊन कारवाई करण्यात आली आहे,छत्रपती संभाजी नगर ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ.विनय राठोड व पोलीस अप्पर आधिक्षक सुनिल लांजेवार यांनी दवाखान्यात जाऊन पारधे यांची चोकशी केली. पारधी यांची परिस्तिथी नाजूक आसल्याचे समजते. ताज्या बातमी अनुसार समाजकल्यान मंत्री यानी दवाखान्यास भेट देउन पारधे ची तबेतीची महीती डॉक्टरांकडून घेतली.
_______________जाहीरात____________
___________________________________
आता अशा घटना ,वारंवार घडत असलेल्या राज्यात दिसत आहे ,तरी चायना सारख्या देशातून मांजा बाजारपेठात आलेला आहे अशा घातक मांज्यांवरती बंदी प्रशासन आणणार का ?अजून असे किती बळी घेण्याची वाट पहात आहे?आशा मांज्याने विक्री करणाऱ्या दुकानदारावर कडक , कारवाई करुन त्याचे परवाणे रद्द करावे,जिवीत हाणी झाले सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा.केवळ माणसांना मांजा दोरा घातक नसून पशु पक्षांचा ही जिव या घातक मांजाने घेतला आहे.शासनाचे डोळे आतातरी उघडणार का?



Post a Comment
0 Comments