जनतेनं नाही तर बंटी पाटील व राजू बाबा यांनी खुर्चीवर बसवलंय नगराध्यक्षा जानवेकर खुर्चीवर नीट बसायचं .... नाही तर खुर्ची खाली करायची - मनीषा दबडे
हातकणंगले / योगेश पांडव - निमित्त ... 5 वर्ष लोकप्रतिनिधींचे, विकास हातकणंगलेचा.... या उपक्रमा अंतर्गत नागरी समस्यांचा आढावा घेत असताना वेताळ चौक परिसरातील महिलांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी अनेक समस्यांचा पाढाच त्यांनी वाचला. मात्र ह्या सर्व समस्यांपेक्षा अरेरावीची भाषा वापरणाऱ्या नगराध्यक्षा अर्चना जानवेकर यांचा खरपूस समाचार मनीषा दबडे यांनी घेतला. त्या पुढे म्हणाल्या की, अनेक प्रभागात पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर आहेत. यामध्ये पाणी वेळेवर न येणे, रात्री अपरात्री येणे हीच कारणे प्रामुख्याने दिसत आहेत. महिलांना पाणी हा जीव की प्राण असतो. पाणी नाही आले तर घरातील सर्व काम खोळंबतात. व याचाच राग घरातील कुटुंबीय यांच्यावर निघून अनेक वेळा वातावरण तंग बनते. तरी या घरगुती भांडणास कारणीभूत होणाऱ्या नगरपंचायतीने दुर्लक्ष करू नये. तर महिला नगराध्यक्षा असलेल्या अर्चना जाणवेकर यात लक्ष घालून महिलांना न्याय मिळवून देतील या आशेने मी काही महिलांसह नगराध्यक्षा अर्चना जानवेकर यांना भेटण्यास गेलो होतो.. त्यावेळी भेट होऊ न शकल्याने थेट फोनवरून संपर्क केल्यावर नगराध्यक्षा जानवेकर यांनी अरेरावीची भाषा वापरली असा आरोप मनीषा दबडे यांनी केला.
Click To See Video
सहानभूतीने मा.आम. बंटी पाटील व मा.आम. राजू बाबा यांनी खुर्चीवर बसवलं आहे. लोकनियुक्त जरी असला तरी जनतेने तुम्हाला निवडून दिले नाही. खुर्चीवर नीट बसायचं नाही तर खुर्ची खाली करायची.... असा सल्ला मनीषा दबडे यांनी दिला तर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील याकडे कानाडोळा केल्याने येणाऱ्या निवडणुकीत मतदानातून काँग्रेस पक्षाला उत्तर देउ असे मत व्यक्त केलं. यावेळी परिसरातील महिला, नागरिक उपस्थित होते.
___________________________________
____________________________________________________________________




Post a Comment
0 Comments