हातकणंगले तालुक्यातील मनपाडळे या गावांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनगर येथे , ग्रामपंचायत च्या पंधराव्या वित्त आयोगा फंडामधून सर्व नागरिकांसाठी जलशुद्धीकरण आर ओ प्लांट चे उदघाटन ,सौ मनीषा माने माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या हस्ते पार पडला .सदरच्या कार्यक्रमाच्या वेळी स्वागत मनपाडळे गावचे उपसरपंच उल्हास मधुकर वाघमारे यांनी केले .गेले बरेच वर्ष समाजातील लोकांना शुध्द पिण्याच्या पाण्याची गरज भासत होती.नागरीकांच्या आरोग्यासाठी जलशुद्धकरण आर ओ प्लांट मुळे, पाण्याचा प्रश्न मिटला आसे ही मनिषा माने म्हणाल्या. उल्हास वाघमारे यांनी केलेल्या प्रयत्नाला सरपंच रायबा शिंदे व ग्रामसेवक शिल्पा दूधगावकर, यांचे सहकार्य लाभले.
मनपाडळे गावातील नागरिकांना आरोग्य, स्वछता,शिक्षणा ची जबाबदारी ग्रामपंचायतीची आसून ती जबाबदारी पूर्ण करु आसे उप सरपंच उल्हास वाघमारे म्हणाले.
सदरच्या कार्यक्रमास रायबा शिंदे, ग्रामसेवक शिल्पा दूधगावकर, दिपक पाटील, संजय पाटील, अरुण शिंदे, मधुकर सूर्यवंशी ,प्रकाश पाटील,किरण कांबळे ,संपत वाघमारे,दिलीप कांबळे,व सर्व ग्रामपंचायत सदस्य, तसेच आंबेडकर नगर मधील सर्व नागरिक सदरच्या कार्यक्रमात उपस्थित होते

Post a Comment
0 Comments