Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

मा . श्री . सुनिल फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक सो , कोल्हापूर परिक्षेत्र , कोल्हापूर यांनी कोल्हापूर जिल्हयाची वार्षिक निरीक्षण केले.आणी समाधान ही व्यक्त केले.


कोल्हापूर :-२४/1/25

मा . श्री . सुनिल फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक सो , कोल्हापूर परिक्षेत्र , यांनी कोल्हापूर जिल्हयाची वार्षिक निरीक्षण दरम्यान दिनांक २४/०१/२०२५ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय , ..कोल्हापूर यास भेट दिली .

मा . विशेष पोलीस महानिरीक्षक सो , कोल्हापूर परिक्षेत्र , कोल्हापूर यांना सन्माननीय गार्डने व कोल्हापूर पोलीस बँड पथकाने राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत सादर करून मानवंदना दिली . गुन्हे आढावा बैठकीचे सुरवातीलाच कोल्हापूर जिल्हा पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलीस अधिकारी , अंमलदार तसेच सहा . सरकारी अभियोक्ता , सन २०२४ मधील सर्वोत्कृष्ट ०३ गणेश मंडळे नामे १ ) तुकाराम तालीम मंडळ , गोखले कॉलेज चौक , मंगळवार पेठ , कोल्हापूर २ ) कलानगरचा महागणपती , कलानगर , इचलकरंजी ३ ) जय शिवराय व्यायाम तालीम मंडळ , सावर्डे दुमाला , ता . करवीर तसेच चांगली कामगिरी करणारे पोलीस पाटील नामे १ ) सौ तृप्ती प्रदिप जगताप , महिला पोलीस पाटील , केलीं , ता . करवीर २ ) श्री रविंद्र बापूसो जाधव पोलीस पाटील , हणमंतवाडी , ता . करवीर यांना मा . विशेष पोलीस महानिरीक्षक सो , यांचे शुभहस्ते प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले 

सन २०२२ मधील कार्यमुल्याकनाचे आधारे महाराष्ट्र राज्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे म्हणून ०५ पोलीस ठाणेंची निवड करणेत आली होती . त्यात महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवणारे कोल्हापूर जिल्हयातील शिवाजीनगर पोलीस ठाणेस व पाचवा क्रमांक मिळविणारे शिरोळ पोलीस ठाणेस प्रमाणपत्र व . स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले .

गुन्हे आढावा बैठकीदरम्यान मा . विशेष पोलीस महानिरीक्षक सो , यांना कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाने केलेल्या कामाबद्दलची माहिती दिली . त्यामध्ये वर्षभरातील निर्गती केलेले गुन्हे , निर्गती केलेले अर्ज त्यासाठी वर्षभर चालविलेल्या मोहिमा , त्याच प्रमाणे कोल्हापूर जिल्हयात वर्षभरात दाखल झालेले गुन्हे , ते उघडकीस आणणेसाठी केलेले प्रयत्न याबाबतची माहिती दिली तसेच सन २०२३ च्या तुलनेत सन २०२४ ला गुन्हयामध्ये घट झाली असल्याचे नमुद केले . याशिवाय पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित यांनी महिला विषयी गुन्हे , शरिराविरुध्दचे गुन्हे , अवैध धंदयावर केलेली कारवाई याबाबत माहिती दिली . कोल्हापूर पोलीसांनी केलेली प्रतिबंधात्मक कारवाई , डायल ११२ , तसेच वर्षभरात केलेल्या कारवाईची माहिती दिल


या सर्व बाबी पाहिल्यानंतर मा . विशेष पोलीस महानिरीक्षक सो , कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांनी कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाचे कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले तसेच कोल्हापूर पोलीस दलाचे कामकाजाबाबत मा . मुख्यमंत्री सो , म.रा. मुंबई यांनी दिलेल्या ०७ कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे कोल्हापूर जिल्हा पोलीस दलास सुचना दिल्या .

कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदारांच्या समस्येबद्दल अलंकार हॉल येथे मा . विशेष पोलीस महानिरीक्षक सो , यांनी दरबार घेतला तसेच अंमलदारांच्या समस्या ऐकून घेवून त्यांचे निराकरण केले . जिल्हा सरकारी अभियोक्ता यांची देखील मा . विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी बैठक घेवून गुन्हयाचे दोषसिध्दी प्रमाणे वाढविणेबाबत चर्चा केली . सरकारी अभियोक्ता व पोलीस दलामध्ये समन्वय राहणेबाबत मार्गदर्शन केले . कोल्हापूर जिल्हयातील उद्योजक यांची मिटींग घेवून त्यांच्या अडचणी , समस्या जाणून घेतल्या तसेच पोलीस दलाकडून त्यांना योग्य ते सहकार्य मिळेल याची शाश्वती दिली .

आज रोजी झालेल्या वार्षिक निरीक्षणास पोलीस अधीक्षक , अपर पोलीस अधीक्षक ०२ , पोलीस उप अधीक्षक ०७ , सर्व प्रभारी अधिकारी , ३० जिल्हा सरकारी अभियोक्ता तसेच २५ ते ३० उद्योजक उपस्थित होते .

___________________________________










Tags

Post a Comment

0 Comments