Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

एस.टी. बसमध्ये प्रवास करीत असताना चोरी करणारे महिलेस पकडले ...

 


    LCB पथकाची कौतुकस्पद कारवाई. 

87 ग्रॅम सोन्याचे व 30 ग्रॅम चांदीचे असा एकूण 6,50,424 / - रू . किंमतीचा मुद्देमाल जप्त

एस.टी. बसमध्ये प्रवास करीत असताना चोरी करणारे महिलेस पकडले ...


      पल्लवी प्रशांत चौगुले (संशयीत आरोपी)

एस . टी . बसमधुन प्रवास करीत असताना सोन्याचे दागीने चोरने असे गुन्हे घडत असलेने त्याबाबत मा . पोलीस अधीक्षक , श्री . महेंद्र पंडित सो यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रविंद्र कळमकर यांना स्वतंत्र तपास पथक तयार करुन अशा प्रकारे कोल्हापूर जिल्ह्यात घडलेल्या गुन्हयांचा समांतर तपास करून गुन्हे उघडकीस आणणे बाबत आदेशित केले होते .

मा . वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री . रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा , कोल्हापूर कडील पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच पोलीस अमंलदार यांचे तपास पथक तयार करुन नमुद एस . टी . बसमधून सोन्या - चांदीचे दागने चोरीस गेलेबाबत दाखल असले गुन्हयांची माहिती संकलीत करुन एकत्रीत समांतर तपास सुरु केला . नमुद तपास पथकातील पोलीस अंमलदार शुभम संकपाळ व महेश पाटील यांना त्यांचे गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की , पल्लवी चौगुले रा . कोरोची , ता . हातकणंगले ही एस . टी . बस मधून प्रवास करणारे महिलांच्या पर्स एस.टी.मध्ये बसताना अथवा उतरताना गर्दीचा फायदा घेवून चोरी करीत असून तीने कुरुंदवाड पोलीस ठाणे , गु.र.नं. 26/2025 , बी . एन . एस . 303 ( 2 ) प्रमाणे दाखल गुन्हा केला असून ती नमुद गुन्हयातील चोरीचे दागीने विक्री करणेकरीता रामलींग फाटा हातकणंगले या ठिकाणी येणार आहे . अशा मिळाले माहितीप्रमाणे नमुद तपास पथकाने रामलींग फाटा हातकणंगले या ठिकाणी जावून सापळा लावून संशयीत महिला आरोपी नामे पल्लवी प्रशांत चौगुले , व . व . 20 , रा . आंबेडकरनगर कोरोची , ता.हातकणंगले , जि . कोल्हापूर हीस ताब्यात घेवून तिचे कब्जातून 01 ) 54 ग्रॅमचे सोन्याचे गंठण , 02 ) 17 ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र , 03 ) 11 ग्रॅमचे सोन्याचा नेकलेस , 04 ) 03 ग्रॅमचे सोन्याचे मंगळसुत्र , 05 ) 02 ग्रॅमचा कानातील सोन्याचा टॉप्स जोड असे एकूण 87 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने व 01 ) चांदीचे ब्रेसलेट , 02 ) 03 जोड़ चांदीची जोडवी असे एकूण 30 ग्रॅम चांदीचे दागीने असा एकूण 6,50,424 / - रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे . उघडकीस आलेले गुन्हे खालीलप्रमाणे .

01 कुरूंदवाड पोलीस ठाणे कुरूंदवाड पोलीस ठाणे  26/2025 393/2024  बी . एन . एस . 303 ( 2 ) बी . एन . एस . 303 ( 2 )  दाखल तारीख 15.01.2025 | दाखल तारीख 01.12.2024

02जप्त केले मुद्देमालासह पुढील कारवाई करीता पल्लवी प्रशांत चौगुले हीस कुरूंदवाड पोलीस ठाणे येथे हजर केले असुन पुढील तपास कुरुंदवाड पोलीस ठाणे करवी सुरू आहे .

सदरची कामगिरी मा . पोलीस अधीक्षक श्री . महेंद्र पंडित सो , मा . अपर पोलीस अधीक्षक श्री . निकेश खोटमोडे - पाटील साो यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच पोलीस अंमलदार शुभम संकपाळ , महेश पाटील , महेश खोत , संजय कुंभार , लखन पाटील , सागर माने , संजय पडवळ , विजय इंगळे , विशाल चौगुले , संदिप बेंद्रे , सागर चौगुले , अमित सर्जे , वसंत पिंगळे , राजेंद्र वरंडेकर व महिला सहा . फौजदार आरकांज डिसोझा यांनी केली आहे .


Post a Comment

0 Comments