कोर्टाचा निर्णय अमान्य पण महाराष्ट्र बंद मागे .
मुंबई:-
उद्या होणारा महाराष्ट्र बंद बाबतचे हायकोर्टाने दिलेला निर्णय अमान्य परंतु न्यायालयाचा आदर राखून संप मागे घेण्यात आलेला आहे. शनिवार दिनांक २४ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता शिवसेना भवन, दादर येथे शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय श्री.उद्धव साहेब ठाकरे लोकशाही पद्धतीने तोंडाला काळी फीत लावून आणि काळे झेंडे घेऊन आंदोलन करण्यासाठी चौकात बसणार आहेत. तरी बेस्ट कामगार सेनेच्या सर्व पदाधिकारी शिवसैनिकांसहित उद्या सकाळी १०.३० वाजता शिवसेना भवन दादर येथे आपण सर्वांनी काळी फीत लावून आणि झेंडे घेऊन जमायचं आहे. ही विनंती.
सुहास सामंत , रंजन चौधरी
उदयकुमार आंबोणकर यांनी प्रसिध्द माध्यमातून कळवले आहे

Post a Comment
0 Comments