उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी.....!
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज रविवारी दि. ११ सकाळी सव्वानऊ वाजता कोल्हापुरात येताच तीन दिवसांपूर्वीच आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी केली.
यावेळी पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ त्यांच्या समवेत होते. उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य सरकारच्यावतीने कालच नाट्यगृहाच्या नवीन उभारणीसाठी २० कोटी रुपयांचा निधी जाहीर केलेला आहे. या नाट्यगृहाच्या नवीन उभारणीसाठी लागेल तेवढा निधी सरकारच्यावतीने दिला जाईल. तो कमी पडू दिला जाणार नाही.



Post a Comment
0 Comments