Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना दिल्लीत अटक.कोल्हापूरात आंदोलन

 

 कोल्हापूर  :दिनांक 22 मार्च24 आम आदमी पार्टीचे अध्यक्ष  दिल्ली चे मुख्यमंत्री ,अरविंद केजरीवाल यांना कथाकथित प्रकरणात ईडीने दिनांक 21 मार्च रोजी सायंकाळी अटक केली .त्याचा पडसाद पूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या शहरांमध्ये ,आंदोलन करण्यात आले. भाजप कार्यालयाच्या समोर आक्रोश  व घोषणा देण्यात आल्या. महाराष्ट्रात ही विविध शहरांमध्ये याचा चांगलाच पडसाद उमटला कोल्हापुरात आम आदमी पक्षाच्या वतीने शहरातील महावीर कॉलेज शेजारी असणाऱ्या भाजपा कार्यालयासमोर, भाजप तसेच मोदी सरकारचा निषेध करून आंदोलन करण्यात आले ,यामध्ये आम आदमीच्या कार्यकर्त्यांनी भाजपा विरोधात घोषणाबाजी करून "नही चलेगी नही चलेगी  तानाशाही नही चलेगी अशा घोषणाही दिल्या".

 पोलिसांचा मोठा फौज फाटा या वेळेला उपस्थित होता. काही वेळातच आंदोलन करत्यांना पोलिसांनी अटक करून, ताब्यात घेतले. यामध्ये आम आदमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र संघटक अध्यक्ष संदीप देसाई ,माजी

--------------जाहिरात------------


जिल्हा अध्यक्ष निलेश रेडकर ,शहर अध्यक्ष उत्तम पाटील, नूतन जिल्हाध्यक्ष अरुण गळदगे, अनुसूचित जाती जमाती आघाडी प्रमुख अर्जुन कांबळे ,जिल्हा उपाध्यक्ष ओंकार पताडे, अभिजीत कांबळे इत्यादी अशा एकूण 23 कार्यकर्त्यांना शाहूपुरी पोलिसांनी अटक करून. त्यांच्यावर भा द स. कलम 141 , 143 , 149 , and 188

म पो अधिनियम 37 (1)3/135 शाहूपुरी पोलीस  ठाणे येथे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments