Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

पूरग्रस्तांसाठी पुन्हा मदतीचा हात...


  कोल्हापूर : तावडे हॉटेल उचगाव परिसरात नदीचे पाणी आल्यामुळे म्हणजेच पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे तेथील पूरग्रस्तांचे स्थलांतरण विक्रम नगर येथील आय आर बी ने बांधलेल्या इमारतीमध्ये त्यांना राहण्यास आसरा दिला आहे. त्या ठिकाणी त्या पूरग्रस्तांना एक हात मदतीचा म्हणुन नूतन जिल्हाध्यक्ष कोल्हापूर विजय जाधव यांच्या सूचनेनुसार माजी नगरसेवक रशीद बारगीर यांनी  धान्याचे किट वितरण केले. सामजिक बांधिलकी  जपत  बत्तीस कुटुंबांना  धान्य किट वितरण करण्यात आले. विजय जाधव भाजपा जिल्हाध्यक्ष कोल्हापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे किट वाटप करण्यात आले.यावेळी विजय जाधव भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष कोल्हापूर,रशीद बारगीर माजी नगरसेवक, अभिजीत शिंदे,आजम जमादार , शाहरुख गडवाले, दिनेश पसारे, मानसिंग पाटील, बापू राणे, योगेश साळोखे,कुमार पाटील, सूनिलसिंह चव्हाण, ओंकार घाटगे,सागर केंगारे, प्रविणचंद्र शिंदे, सागर देसाई, विश्वजीत सागर, पापाभाई सय्यद, रमजान पागर, शिरीष घामाळकर, युवराज ऊर्फ पप्पु पाटील,पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments