Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

'गोकुळमध्ये सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का !'


'चाचणी लेखापरीक्षण सुरू ठेवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश'


संचालिका सौ.शौमिका महाडिक यांच्या तक्रारीनुसार कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. सदरचे लेखापरीक्षण थांबवावे, तसेच चौकशी करू नये यासाठी गोकुळ दूध संघाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. 


यावेळी गोकुळ दूध संघाचे चाचणी लेखापरीक्षण थांबवण्यास उच्च न्यायालयाने स्पष्टपणे नकार दिला आहे. तसेच याबाबतच्या पुढील सुनावणीसाठी ८ जून ही तारीख कोर्टाने दिली आहे.


कोर्टाला उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने याबाबतच्या सुनावणीसाठी १ महिन्यानंतरची तारीख कोर्टाकडून देण्यात आली असून, तोपर्यंत पुढील कारवाई संदर्भात निर्देश देऊ नयेत अश्या सूचना शासनास दिलेल्या आहेत. 


दरम्यान गोकुळच्या चाचणी लेखापरीक्षण अहवालाचे कामकाज सुरू ठेऊन शासनास अहवाल सादर करण्याचे  आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे गोकुळमधील सत्ताधारी गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Post a Comment

0 Comments