Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

महावितरण उंचगाव चा आंधळा कारभार .



उंचगाव महावितरण चा आंधळा कारभार .
कोल्हापूर करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी मधील उजलाई कॉलनी मध्ये महावितरणचे प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर कडून चक्क रस्त्यात लाईटचा खांब बसवला आहे. तिथेच एका रहिवाशाने त्याच्या घराचे बांधकाम करत असताना विद्युत तारेचा बांधकाम करणेस अडथळा येत होता त्या प्रवाह वाहिनी ला बाजूला करण्यासाठी सार्वजनिक रस्त्यात बांधकामास अडथळा होऊ नये म्हणून नियमबाह्य खाजगी कॉन्ट्रॅक्टर कडून शेजारच्या लोकांची परवानगी न घेता विद्युत खांब नियमबाह्य बसवून घेतला. तेथे वीस फूट गटारीसह रस्ता असताना दोन्ही बाजूने अतिक्रमण झाले आहे. तेथे ग्रामपंचायत सदस्य राहत असताना सुद्धा खांब अतिक्रमण करून बसवणे आला आहे. जबाबदार ग्रामपंचायत सदस्य यांनी रस्त्यात येणाऱ्या अडथळ्याला दूर करणे गरजेचे होते. सदर प्रकरणी इतर लोकांनी ग्रामपंचायत व महावितरण यांच्याकडे तक्रार केली असता देखील आज अखेर महावितरण यांनी खाजगी कंत्राटदार यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही या प्रकरणामुळे नागरिकांत   संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.
---------------------------------------



 

Post a Comment

0 Comments